Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. ६ फेब्रुवारी : . भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांची आज रविवारी सकाळी ९.३० वाजता च्या सुमारास  प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.

कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. मात्र लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे दुखद निधन झाले. यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबईतील पेडर रोड भागातील लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी १२.३० वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

लता मंगेशकर यांच्यावर महिनाभरापासून उपचार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या ३०  दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शनिवारी लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. त्याआधी लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि प्रख्यात गायिका आशा भोसले, बंधू आणि सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी शनिवारी रात्री भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि श्रद्धा कपूर, पियुष गोयल यांनीही रुग्णालयात भेट दिली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून श्रद्धांजली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आदरांजली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून शोक

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.