Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने संविधान साक्षरता अभियान कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्र्वर तालुक्यातील अंजनेरी गावात घेण्यात आला हा कार्यक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

विशेष प्रतिनिधी : सचिन कांबळे

नाशिक, दि. ६ फेब्रुवारी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने तसेच विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर संविधान साक्षरता अभियान पासुन विविध कार्यक्रमाचे आयोजन समतादुतांमार्फत राबवण्यात येत असून त्रंबकेश्र्वर तालुक्यातील अंजनेरी गावात दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी संविधान साक्षरता बाबत विविध विषयांस अनुसरून प्रबोधन व स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  सदर कार्यक्रम कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कार्यक्रम त्रंबकेश्र्वर तालुक्यातील अंजनेरी गावातील मातोश्री सोनई माध्यमिक शाळा या ठिकाणी दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमाची सरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभिवादन करून  करण्यात आली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती अधिकार अधिनियम (RTI) २००५ कायदा व भारतीय संविधान या विषयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

समतादूत सुजाता वाघमारे यांनी माहिती अधिकार अधिनियम (RTI) २००५ कायदा बद्दल मार्गदर्शन करतांना म्हणाले की, “माहितीच्या अधिकारामुळे तुम्हाला हवी असलेली माहिती त्वरित प्राप्त होते म्हणजे तुम्हाला हवी असलेल्या माहितीसाठी कुठल्याही शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत किंवा कोणासमोर हाजीहाजी करण्याचा प्रसंग येत नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आपले हक्क आणि शासनाचे कर्तव्य काय आहे हे भारतातील जागरूक नागरिक म्हणून प्राप्त करण्यासाठी माहितीचा अधिकार २००५ याचा वापर करुन तुम्हाला माहिती प्राप्त करता येते.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भारताच्या राज्यघटनेनुसार भारत हे लोकशाहीचे राज्य आहे. म्हणजेच लोकांनीच लोकांकरिता उभे केलेले राज्य स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही अनेक दशके उलटून गेली. परंतु सत्य स्थितीत मतदान पलीकडे नागरिकांचा राज्य कारभारात फारसा सक्रीय सहभाग दिसून येत नाही. खरेतर भारतासारख्या लोकशाही राष्ट्रात प्रत्येक नागरिकांकडून राज्य आणि केंद्राच्या कारभारात आवर्जून सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी नागरिकांना मूलभूत हक्क राज्य घटनेने बहाल केले आहेत. म्हणजेच नागरिकांना राज्याच्या किंवा केंद्राच्या कारभारात मत मांडण्यासाठी शासकांची कार्यपद्धतीची माहिती सार्वजनिक हिताच्या बाबी कशा प्रकारे शासनाकडून हाताळलेल्या जातात. हे जाणून घेण्याचा हक्क प्राप्त व्हावा म्हणून माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा अस्तित्वात आणण्यात आला. अशी विस्तृत माहिती यावेळी सुजाता वाघमारे यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे देखील निरसन करण्यात आले. व भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचून करून कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थितांनी असे वैशिटयपूर्ण उपक्रम नेहमीच राबवले जावे असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी सदर शाळेचे मुख्याधयापक पी. आर. जोंधळेसह शिक्षकवृंद व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : 

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था च्या वतीने शाळा, शासकीय कार्यालयांना संविधान प्रास्ताविकाची फ्रेम भेट

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

शिक्षकांच्या TET प्रमाणपत्राची पडताडणी, २०१३ नंतर लागलेले शिक्षक रडारवर

 

 

 

Comments are closed.