Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिक्षकांच्या TET प्रमाणपत्राची पडताडणी, २०१३ नंतर लागलेले शिक्षक रडारवर

बुलढाण्यातील २५८ शिक्षकांनी प्रमाणपत्र केले जमा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बुलढाणा, दि. ५ फेब्रुवारी : शिक्षक पात्रता परीक्षेत हजार ८०० शिक्षकांनी पैसे देऊन पात्रता प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती पुणे पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे.

त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील २५८ शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे जमा केली आहे. हे प्रमाणपत्र परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे पडताळणी साठी पाठवण्यात आले आहेत. सन २०१३ पासून राज्य शासनाने शिक्षक नियुक्तीसाठी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये लाखो उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली. परंतु टीईटी परीक्षेतील उमेदवारांना लाखो रुपये घेऊन पास केल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होत आहे. राज्यातील काही उमेदवारांना नोकरी टिकविण्यासाठी टीईटी उत्तीर्ण केल्याची बनावट प्रमाणपत्र तयार करून शिक्षण विभागाकडे सादर केली आहे. आता टीईटी परीक्षेचा घोटाळा समोर आल्यामुळे या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे.

त्यामुळे शेकडो शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. राज्य परीक्षा परिषदेकडे सुमारे ६ हजार ८६ प्रमाणपत्रे पडताडणी साठी आली आहेत यात बुलडाणा जिल्ह्यातील २५८ शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताडणी साठी जमा करण्यात आले असून या प्रमाणपत्राची पडताडणी सुरू झाली आहे. बनावट प्रमाणपत्रे असणाऱ्या शिक्षकांना नौकरी तर गमवावी लागणारच आहे सोबतच त्यांना जेलची हवा सुद्धा खावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

धक्कादायक! एक बिबट्या, दोन कोल्हे, तीन रानकुत्रे तर एका रानमांजरीचा विषबाधेतून मृत्यू

भीषण अपघात : ट्रक आणि अल्टो कारची समोरासमोर धडक, धडकेत चारजण गंभीर

देव दर्शन घेतल्याने “त्या” गावाने संपूर्ण दलित समाजावर टाकला बहिष्कार

 

 

Comments are closed.