Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! एक बिबट्या, दोन कोल्हे, तीन रानकुत्रे तर एका रानमांजरीचा विषबाधेतून मृत्यू

पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रातील पिंपळगाव निपाणी येथील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भंडारा, दि. ५ फेब्रुवारी : पवनी तालुक्यात येत असलेल्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील पिंपळगाव निपाणी वनपरिक्षेत्रात एक बिबट्या, दोन कोल्हे, तीन रानकुत्रे तर एका रानमांजरीचा विषबाधेतून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने वनविभागात खळबळ माजली आहे.

पिंपळगाव निपाणी गट क्रमांकात सदर घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला आज घटनास्थळी दुपारी १.०० च्या सुमारास पहिल्यांदा बिबट मृतअवस्थेत आढळून आला. त्या संदर्भातील माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी वनकर्मचारी दाखल होऊन घटनेची चौकशी करीत असतांना काही अंतरावर पुन्हा वन्यप्राणी मृत अवस्थेत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावेळी वन कर्मचाऱ्याने ३ किमी अंतरापर्यंतचे जंगल पिंजून काढले. त्यावेळी वन कर्मचाऱ्यांना दोन कोल्हे, तीन रानकुत्रे व एका कालव्यात रान मांजरासह सात वन्यप्राणी मृत अवस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेची माहिती घेण्यासाठी लाखनी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके व त्यांच्या चमूला घटनास्थळी बोलावून सर्व वन्यप्राण्याचे शवविच्छेदन केल्यानंतर विषबाधेतून सदर प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले आहे.

या घटनेत बिबट ७ ते ८ वर्षाचा असल्याचा अंदाज असून ती मादी आहे तर दोनही कोल्हे मादीच आहे. तर यातील तीन रानकुत्रे नर होते. या सर्व वन्यप्राण्याची पशुवैद्यकीय अधिकारी, व वनकर्मचाऱ्यांच्या समक्ष शवविच्छेदन करून त्याच वनपरिक्षेत्रात अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

भीषण अपघात : ट्रक आणि अल्टो कारची समोरासमोर धडक, धडकेत चारजण गंभीर

हंगामाच्या सुरवातीलाच बाजार समितीत आजवान ला विक्रमी १६००० हजार चा भाव

देव दर्शन घेतल्याने “त्या” गावाने संपूर्ण दलित समाजावर टाकला बहिष्कार

 

 

Comments are closed.