Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हंगामाच्या सुरवातीलाच बाजार समितीत आजवान ला विक्रमी १६००० हजार चा भाव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नंदुरबार, दि. ५ फेब्रुवारी : दररोज च्या जेवणात आणि आयुर्वेदात महत्व असलेल्या ओवा अर्थात आजवान पीक या वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न देऊन जात आहे. उत्तर महाराष्ट्र मध्ये फक्त नंदुरबार जिल्ह्यात हे पीक घेतलं जात असते, आजवानला बाजार समितीत विक्री येत असून मराठवाडा आणि विदर्भातून व्यापारी खरेदी साठी उत्सुकता दाखवत असल्याने आजवानचे दर १२ हजार ते १६ हजार प्रति क्विंटल च्या पुढे गेलं आहेत .

या हंगामातील आजवान विक्रीसाठी बाजार समितीत येत आहे. या वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आजवानचे उत्पन्न झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात पिकणारे आजवान चांगल्या दर्जाचे असल्याने मोठ्या प्रमाणात त्याला मागणी असते. त्यामुळे आयुर्वेदयिक औषधी बनविणारे आणि मसाला दुकानदार यांची मागणी असते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे अनेक भागातून व्यापारी खरेदी साठी बाजार समितीत येत असल्याने या वर्षी चांगला दर मिळत आहे. दररोज नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० क्विंटल पेक्षा अधिक आजवान ची आवक होत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अमृतकर यांनी दिली आहे. बाजार समितीत आता पर्यंत ५००० क्विंटल आजवान खरेदी करण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचे दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन; प्रशासनाची अंत्ययात्रा काढून केला निषेध 

शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद विकास कामांवरून चव्हाट्यावर, उपमुख्यमंत्रीच्याच कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध

देव दर्शन घेतल्याने “त्या” गावाने संपूर्ण दलित समाजावर टाकला बहिष्कार

 

Comments are closed.