Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्‍यात शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात

सांस्‍क़ृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपुर, दि. १४ ऑगस्ट : हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापूढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा राज्‍याचे नवे सांस्‍कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होवून सांस्‍कृतिक खात्‍याची जवाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पुर्वसंध्‍येला श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.

वंदे मातरम् हे आपले राष्‍ट्रगान आहे. हा केवळ एक शब्‍द नसुन भारतीयांच्‍या भारतमाते विषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. १८७५ मध्‍ये बंकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले हे गीत त्‍याकाळात स्‍वातंत्र्यासाठी लढणा-यांना उर्जा देण्‍याचं काम करत होते. ‘हे माते मी तुला प्रणाम करतो’ अशी भावना व्‍यक्‍त करत बंकीमचंद्रांनी मनामनात देशभक्‍तीचे स्‍फुल्‍लींग चेतविले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्‍या या रचनेतील एकेक शब्‍द उच्‍चारताच देशभक्‍तीची भावना जागृत होते. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्‍द त्‍यागत त्‍याऐवजी शासकीय कार्यालयांमध्‍ये यापूढे वंदे मातरम् म्‍हणत संभाषण सुरु करणार आहोत. १८०० साली टेलिफोन अस्‍तीत्‍वात आल्‍यापासून आपण हॅलो या शब्‍दाने संभाषण सुरु करतोय. आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् ने संभाषण सुरु करण्‍याचा निर्णय सांस्‍कृतिक कार्यामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. सांस्‍कृतिक कार्या विभागातर्फे लवकरच याबाबतचा शासन निर्णय निर्गमीत करण्‍यात येईल असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वृक्षारोपण हे ईश्वरीय कार्य – मंत्री सुधीर मुनगंटीवार

हायड्रोसीलच्या रुग्णांची शासकीय निधीतून शस्त्रक्रिया – मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.