Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समीर वानखेडे यांना केंद्रीय जात पडताळणी समितीने दिली क्लीन चीट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

दिल्ली, दि. 15 ऑगस्ट : मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल विभागाचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे  यांना केंद्रीय जात पडताळणी समितीने क्लीन चीट दिली आहे.तत्कालीन मंत्री नवाब मलिक, मनोज संसारे आणि इतरांनी वानखेडे हे मागासवर्गीय नसून त्यांनी खोटा दाखला देत नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता, त्याआधारे समितीने त्यांच्या दाखल्याची पडताळणी केली.

वानखेडे हे जन्माने मुस्लिम नसून ते हिंदू धर्मातील महार ३७ या मागासवर्गीय समाजाचे असल्याचे समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. वानखेडे यांनी त्यांच्या मुंबईतील कार्यकाळात असंख्य ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केले होते, त्यातील एका प्रकरणात मलिक यांच्या जावयालाही अटक करण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

IPS मनिष कलवानिया यांचा राष्ट्रपतींकडून शौर्य पदकाने होणार सन्मान

 

 

 

Comments are closed.