Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

IPS मनिष कलवानिया यांचा राष्ट्रपतींकडून शौर्य पदकाने होणार सन्मान

8 तासांच्या चकमकित 5 जहाल नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या IPS मनिष कलवानियांचा होणार सन्मान.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

छ.संभाजी नगर 14 ऑगस्ट  :-  आपल्या जीवाची बाजी लावून पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या आणि सध्या औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आलेले IPS मनिष कलवानिया यांना महामहिम राष्ट्रपती यांचेकडुन शौर्य पदक जाहिर झाले आहे. मनिष कलवानिया हे गडचिरोली येथे कार्यरत असताना त्यांच्या नेतृत्वात दिनांक 18/10/2020 रोजी नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना महाराष्ट्र -छत्तीसगढ सिमेवर 8 तासांच्या चकमकित 5 जहाल नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला होता. याची दखल घेऊन IPS मनिष कलवानिया यांचा राष्ट्रपतींकडून शौर्य पदकाने होणार सन्मान करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोलीत अपर पोलीस अधीक्षक म्हणुन कार्यरत होते.

सप्टेंबर/2019 ते सप्टेंबर/2021 या दरम्यान अपर पोलीस अधीक्षक म्हणुन गडचिरोली येथे कार्यरत होते.दिनांक18/10/2020 रोजी नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना महाराष्ट्र -छत्तीसगढ सिमेवर किसनेली गावाजवळ 60 ते 70 नक्षल असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री. मनिष कलवानिया, यांचेे नेतृत्वात सी-60 कमांडो पथकासह 15 किमी घनटाद जंगलात पायी जाऊन सर्च ऑपरेशन राबवित असतांना नक्षलांनी पोलीसांचे दिशेने जोरदार गोळीबार सुरू केल्याने तेथे प्रत्युतरात पोलीसांनीही गोळीबार सुरू केला. यावेळी मा. मनिष कलवानिया, यांचे सह त्यांचे सी-60 कमांडो पथकाने आपले प्राणाची बाजी लावुन नक्षल हल्ला परतावुन लावला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अपर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी 8 तासांच्या चकमकित 5 जहाल नक्षल्यांचा केला होता खात्मा.

सदर  घटनेत पोलीस आणि नक्षल यांच्यात 8 तास भीषण चकमक चालली. यामध्ये पोलीसांचा वाढता दबाब पाहुन तेथून नक्षली पळुन गेले. या ठिकाणाची पाहणी केली असता तेथे 05 जहाल नक्षलींचे मृतदेह तसेच मोठया प्रमाणावर शस्त्र, दारूगोळा, कुकर बॉम्ब, स्फोटके व ईतर नक्षली साहित्य ही मिळुन आले होते.

सदर अभियानामध्ये मा. मनिष कलवानिया, तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक (अभियान) गडचिरोली. व सोबत त्यांचे सी-60 कमांडो पथकाने यांनी टिपागड दलम, कोरची दलम, आणि प्लाटुन 15 मधील जहाल नक्षलवादीना टिपण्यात यश आले होते.सदर चकमकीमध्ये ठार झालेल्या नक्षलवादयावर 18 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

सदर साहसी आणि नक्षल चळवळीला हादरा देणा-या शौर्यपूर्ण कामगिरी बाबत छ.संभाजी नगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, मनिष कलवानिया यांना देशाचे महामहिम राष्ट्रपती यांचे कडुन “शौर्य पदक” Gallantry Medal जाहिर करून सन्मानित करण्यात आले आहे.

हे देखील वाचा.

 

 

Comments are closed.