आदिवासी शिव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय डव्वा येथे सर्प जनजागृती अभियान राबवण्यात आले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सडक अर्जुनी, २४, ऑगस्ट :- तालुक्यातील सृष्टी पर्यावरण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास बहुउद्देशीय संस्था सडक अर्जुनी यांच्यातर्फे सदर कार्यक्रम घेण्यात आले. सविस्तर असे की पावसाळ्यात साप दिसण्याचे प्रमाण वाढलेले असते तसेच सर्पदंशाने मुत्यू झालेल्यांचे प्रमाण सुद्धा बघायला मिळते. या घटनेत शालेय वि्यार्थ्यांचा सुद्धा समावेश असतो. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये सर्पदंश आणि घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन पर स्लाईड शोचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे सर्पमित्र सदस्य शुभम नंदेश्वर, मोहित खोब्रागडे आणि राज खोब्रागडे यांनी सापाचे पर्यावरणातील महत्व, सापांचे प्रकार, कायदे, सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, आणि सर्पदंश झाल्यास काय करावे या विषयावर विस्तृत माहिती दिली. सदर कार्यक्रमात प्रादेशिक वनविभाग कोहमारा चे अधिकारी तरुण बेलकर सर, एस. यु. चौहान सर सृष्टी फाउंडेशन चे अश्विन नंदेश्वर, तौफिक सय्यद, अमन राऊत, आदिवासी शिव विद्यालय डव्वा शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव गभणे सर, लांजेवार सर, चौधरी सर, राऊत सर, कटरे मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते.
हे देखील वाचा :-
Comments are closed.