Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बरडकिन्ही गावाबाहेरुन आवळगांव जाणा-या मुख्य रस्त्याला मोठं मोठे खड्डे..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बरडकिन्ही, २४, ऑगस्ट :-  तालुक्यातील बरडकीन्ही ते आवळगांव या मुख्य रस्त्याला बऱ्याच दिवसापासून मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या मुख्य मार्गाला पडलेल्या खड्ड्याकडे कोणतेही राजकीय नेते , शासकीय यंत्रणा लक्ष देत नाहीत.
मोठ्या वाहन धारकांना तारेवरची कसरत करून खड्ड्यां मधून जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत असल्यामुळे एखाद्या दिवशी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा या खड्ड्यांमध्ये एखादा मोठा अपघात होऊन एसटी बस पलटली किंवा कार उलटून किंवा रेतीने भरलेले ट्रक फसतील तेव्हा शासकीय यंत्रणेला जाग येईल का? असा प्रश्न बरडकीन्ही व या रस्त्यावरून ये जा करणारे मुडझा, हळदा, आवळगाव, वांद्रा, डोरली, चिचगाव या परिसरातील जनतेला पडला आहे.


बरडकिन्ही हे गाव एका राजकीय नेत्याचे असून त्यांच्या गावात प्रवेश करताना सुरुवातीला खड्ड्यांमध्ये आपले वाहन किंवा पाय ठेवावे लागते आणि त्यानंतरच त्यांच्या गावात प्रवेशद्वारातुन प्रवेश करावा लागतो. त्यांच्या गावाच्या प्रवेशद्वारासमोरूनच मुख्य रस्त्यावरून चिचगाव , वांद्रा, आवळगाव ला जावे लागते. या रस्त्यावरून रेतीने भरलेल्या हायवा ट्रकची रात्रंदिवस ये जा सुरू असते.
अशा या खड्डेमय रस्त्याकडे राजकीय नेते किंवा शासकीय यंत्रणेने लक्ष देऊन या मुख्य रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय टाळावी अशी या परिसरातील मागणी जोर धरू लागली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

आदिवासी शिव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय डव्वा येथे सर्प जनजागृती अभियान राबवण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.