Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“त्या” दोन मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. २५ ऑगस्ट : जिल्ह्यातील वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलावात दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  विस्तीर्ण जलाशयासोबत सेल्फी काढताना हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ मित्र तलावाशेजारी फिरण्यासाठी गेले होते. सिंचन तलाव असलेल्या चारगावलगतच्या शेगाव येथील रहिवासी हार्दीक गुळघाने (१९) सेल्फी काढण्यासाठी गेला असताना पाय घसरून तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी आयुष चिडे (१९) सरसावला.  मात्र तोही पाण्यात पडल्याने इतरांनी आरडाओरडा केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती पोलिस विभागाला प्राप्त होताच शेगाव पोलीस ठाण्याच्या चमूने घटनास्थळ गाठून स्थानिक मासेमारांच्या सहाय्याने दोघांनाही शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. २ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर दोन्ही मित्रांचे मृतदेहच हाती लागले.  या युवकांच्या अचानक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबई महापालिकेवरून आमदार सरवणकरांचे गौप्यस्फोट

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.