Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कातकरी बांधवांची पिळवणूक .

अवघ्या दोन हजार रुपयांत अडीच महिने काम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

देवगांव (जि.नाशिक) 17, सप्टेंबर :- आदिवासी कातकरी बांधवांची पिळवणूक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही थांबलेली नाही. आजही काही सधन लोक कातकरी – आदिवासी बांधवाना वेठबिगारा सारखे वागवत आहेत. प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

काही दिवसांपूर्वी घडलेले
इगतपुरी तालुक्यातील गौरी आगीवले मृत्यू प्रकरण ताजे असतांनाच नाशिक जिल्ह्यातील वेठबिगार मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. एकीकडे कमी पैशात आदिवासी, कातकरी बांधवांना राबवून वेठबिगारीसारखे प्रकरण उजेडात येत असतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील कातकरी कुटुंबातील चार जणांना चक्क दोन हजारात अडीच महिने राबवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या कातकरी कुटुंबातील चौघांना दोन  हजार रुपयांत अडीच महिने राबवून घेत त्यांची पिळवणूक केल्या प्रकरणी खदान मालकावर वेठबिगारी कायद्यांतर्गत मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील महादू मुकणे वय (६०), पत्नी लक्ष्मीबाई (५५), मुलगा गणेश (१५) व मुलगी सविता (१२) हे कुटुंब जून महिन्यात गणेशवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे दगडखाणीच्या कामाला स्थलांतरित झाले होते. यावेळी एक ट्रॅक्टर दगड भरण्यासाठी ५०० रुपये मजुरी देण्याचे ठरले होते. परंतु खदान मालकाने त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत पिळवणूक केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
याप्रकरणी सखोल चौकशी करू आरोपीविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई पोलिसांनी करावी , अशी जनतेतून मागणी होत आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा प्रशिक्षणार्थीचा ‘ दीक्षांत समारंभ ‘ उत्साहात संपन्न !

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.