Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा प्रशिक्षणार्थीचा ‘ दीक्षांत समारंभ ‘ उत्साहात संपन्न !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

धानोरा – गडचिरोली, 17, सप्टेंबर :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धानोरा, जिल्हा गडचिरोली येथे शनिवार १७ सप्टेंबर२०२२ रोजी सकाळी ११वाजता अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै २०२२ मध्ये उतीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींचा ‘ दीक्षांत समारंभ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उदघाटन श्री. संकेत बी. मशाखेत्री ,MTech. IIT, मद्रास स्यानडिक्स अमेरिकन सिड कंपनी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्ममाला व हार अर्पण केला तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती डॉ. रश्मी एस. ढोके मॅडम , प्राचार्य जि. प. हायस्कूल तथा ज्यु. कॉलेज धानोरा यांची लाभली होती. तर प्रमुख पाहुणे श्री. मिथुन मशाखेत्री MD.MCA उद्योजक कोड सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे हे उपस्थित होते. तसेच इंजि. अक्षय पी. शहारे नागपूर BE Electronics व नरेंश बांबोळे अध्यापक तथा कार्याध्यक्ष प्रोटॉन संघटना गडचिरोली हे होते. संस्थेच्या वरीष्ठ लिपिक सौ. ज्योती मोगलेकर मॅडम होत्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे वरिष्ठ निदेशक अविनाश रामटेके हे होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हा कार्यक्रम संस्थेचे प्राचार्य मा. एम. बी.लोणे साहेब व श्री . एस. ए. रामटेके , कनिष्ठ लिपिक तथा भांडारपाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात आला.

ह्या कार्यक्रमात प्रती व्यवसायातून प्रथम, द्वितीय, व तृतीय अशी ३ वर्षे झालेल्या प्रशिक्षणार्थ्यास पदवी प्रमाणपत्र, मेडल्स, व शिल्ड देवून सत्कार करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील निदेशक श्री. के.डी. जांभूळकर, जी.के.सावरकर, ए. पी. मशाखेत्री , पी.एस.टेम्भुरने , एन. एन.मोहुले, कु.के.एस.नरोटे, चांदेमार सर, नुत्तीवार मॅडम, इतर कर्मचारी कु. दाशाबाई कुमरे , पुष्पाबाई कोटांगले , अभय राऊत, साईनाथ वाघाडे, रमेश शहारे यांचा सिंहाचा वाटा आहे . कार्यक्रमाचे संचालन कु. नुत्तीवार मॅडम व प्रास्ताविक मोहूले सर यांनी यशस्वीपणे पार पाडले. या कार्यक्रमाची सांगता चहा-नास्ताने करण्यात आली.

हे देखील वाचा :-

गोलमाल है भाई यह सब गोलमाल है !

शिवाजी पार्क यावर्षी कुणाला ?

Comments are closed.