Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवाजी पार्क यावर्षी कुणाला ?

मुंबई महानगरपालिका द्विधा मन: स्थितीत .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 17, सप्टेंबर :- शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली, त्यावेळेपासून दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होत आला।आहे. फक्त दोनदा शिवाजी पार्क वरील दसरा मेळावा रद्द झाला होता. एकदा पाऊस पडल्याने तर दुसऱ्यांदा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मेळावा रद्द झाला होता. मात्र त्यावेळी शिवसेना एकसंघ होती, आणि शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे त्यावेळी हयात होते.

आताची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फुटून बाहेर पडले आहेत,आणि त्यांनी भाजप सोबत महाराष्ट्रात सरकारही बनविले आहे. आता शिवसेनेचे दोन गट असल्याने कोणत्या गटाला परवानगी द्यायची याबाबत मुंबई महानगरपालिकेने नगरविकास विभागाकडे विचारणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडेच नगरविकास खाते असल्यामुळे त्यांनाच ते मैदान हवे आहे. त्याप्रमाणे शिंदे गटानेही अर्ज केला आहे. मात्र हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याने विधी विभागाचे मतही घेतले जात आहे. यासर्व परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दोन्ही गटांना परवानगी मिळणे कठीण दिसते.
दरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव आणि न्यायालयाने सुद्धा शिवसेना कुणाची यावर अध्याप कुणाची यावर निर्णय दिला नसल्याने हे मैदान कुणालाच दिले जावू नये असा सूर महानगरपालिकेच्या विधी विभागाने लावल्याचे वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे नक्की काय करावे या द्विधा मन:स्थितीत मुंबई महानगरपालिका आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

वैयक्तिक टीका, वैयक्तिक शिवीगाळ, जमिन व सामाजिक वादावादी यासाठी यापुढे एट्रॉसिटी टाकता येणार नाही – सुप्रीम कोर्टाचा निकाल

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पालघरमधील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा पहिला शाखाप्रमुख काळाच्या पडद्याआड..

Comments are closed.