Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघरमधील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा पहिला शाखाप्रमुख काळाच्या पडद्याआड..

ज्येष्ठ शिवसैनिक अरुण माया किणी (पाटील) यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर प्रतिनिधी, दि. १६ सप्टेंबर :  पालघरमधील शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणुन ओळख असलेले, तसेच तालुक्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखेचा पहिला शाखाप्रमुख म्हणून आणि पालघरमध्ये शिव सेनेचे बीज रुजवणारे अरुण माया किणी (पाटील) ह्यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी आज शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या बहाडोली या गावात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एक सच्चा शिवसैनिक गमावल्याची भावना संपूर्ण पालघर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

पालघर तालुक्याच्या पूर्व विभागामध्ये एका खेडे गावामध्ये १९७० मध्ये म्हणजे बरोबर ५२ वर्षांपूर्वी शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करण्यात आली ते गाव होते बहाडोली. त्यावेळचे शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते विनोद पाटील आणि दिलीप शृंगारपुरे यांच्या हस्ते शाखेचे उदघाटन झाले होते. अरुण माया किणी, हे पहिले शाखा प्रमुख आणि देवराव पाटील हे उपशाखाप्रमुख झाले होते. त्यानंतर त्यांनी बहाडोली ग्रामपंचायतचे सरपंच पद तसेच मनोर विभागाचे विभागप्रमुख पदही भूषविले होते. तसेच ग्राम पंचायती पासून ते विधानसभा – लोकसभेच्या निवडणुकीत देखील अरुण माया हे शिवसेनेचा भगवा घेऊन प्रचारात हिरीरीने भाग घेत असत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पूर्वी मनोरच्या ग्रामीण भागात भाताचा काळबाजार व्हायचा, शिवसैनकांच्या सहाय्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात देणे, तसेच ग्रामीण
भागात शिवसेना शाखा स्थापन करण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. येथून त्यांचे कार्य म्हणजे ८० टक्के समाजकारण व २० राजकारण या शिवसेनेच्या तत्वानुसार त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली होती. गावातील काही विरोधी लोकांनी त्याच्यावर खोट्या केसेस टाकल्या होत्या. त्याचाच फायदा घेऊन त्यावेळच्या एका माथेफिरू पोलीस इन्स्पेक्टरनी १९८५-८६ साली गोळीबार
केला. तो दिवस होता गणेशचतुर्थीचा, गावात शिवसैनिकांनी स्वच्छतेचे काम सुरु केले होते. त्याचाच फायदा घेऊन पोलिसांनी एका शिवसैनकास उचलले आणि गाडीत टाकले, अरुण किणी आणि शिवसैनिक यांनी पोलिसांची गाडी अडवली, आणि जाब विचारला कि, आमच्या माणसानी काय गुन्हा केला आहे ? त्यावर पोलिसांनी गाडीसमोरून बाजूला व्हा नाही तर गोळीबार करू. अशी धमकी दिली, परंतु अरुण किणी व शिवसैनिक मागे हटण्यास तयार नव्हते, आणि पुढच्याच क्षणी पोलिसांनी हवेत गोळीबर न करता, थेट शिव सैनिकांवर बेछूट गोळीबार केला, या गोळीबारात दोन शिवसैनिक जाग्यावरच ठार झाले, व इतर आठ जण गंभीर जखमी झाले होते. त्याकाळी मिडीया आजच्या सारखा ऍक्टिव्ह नव्हता तरीही ही बातमी रेडिओवरून एका दिवसात पूर्ण महाराष्ट्रभर पसरली.

त्यावेळी हिंदुहृदयसम्राट दिवंगत श्री बाळासाहेब ठाकरे यांनी बहाडोली येथील गोळीबार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती कि “ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेने पाय रोवलेले या सरकारला बघवत नाही “त्या वेळी काँग्रेसचे सरकार होते. पुढे सरकारी कामात अडथळा
आणल्यामुळे अरुण किणी आणि इतर २८ शिवसैनिक यात महिलांचाही समावेश होता, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्याच्या काळात त्यावेळचे शिवसेनेचे जेष्ठ नेते, धर्मवीर आनंद दिघेसाहेब, मा. मनोहर जोशी, सतीश प्रधान, साबीरभाई शेख, गणेश नाईक, लीलाधर ढाके या सर्व बड्या नेत्यांनी बहाडोली गावाला भेट देऊन अस्थेवाईकपणे चौकशी केली होती. हा खटला जवळ जवळ १८ वर्षे चालला होता.२००३-४ साली या केसचा निर्णय सेशन कोर्टात निर्णय लागला. आणि सर्वच्या सर्व म्हणजे २९ जणांची निर्दोष सुटका करण्यात आली. अशा या सर्व प्रकारणामध्ये अरुण किणी यांची महत्वाची भूमिका होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अरुण किणी यांच्या निधनाने पालघर जिल्ह्यातील एक निष्ठावान कडवट आणि सच्चा शिवसैनिक गमावल्याने शिवसैनिकांसोबतच सामान्य नागरिकांमध्ये देखील शोक व्यक्त केला जात आहे.अरुण माया यांच्या पश्चात, त्यांचा ज्येष्ठ मुलगा अभिनय, दुसरा मुलगा अभिजित उर्फ बबली, मुलगी कविता नरेश पाटील व पिंकी अनिल घरत अशी मुले आणि नातवंड त्याचसोबत त्यांचे चार भाऊ, दामोदर, मंगलदास, गजानन आणि किशोर आणि बहीण श्रीमती तारामती ताराचन पाटील असा मोठ्ठा परिवार आहे.

अरुण किणी यांच्या निधनाची बातमी कळताच शिव सेनेचे  राजन घरत. केतनकाका पाटील, उत्तम पिंपळे,  दिलीप देसाई यांच्यासह अनेक जुने आणि निष्ठावान शिवसैनिक, पदाधिकारी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक भर पावसातही अरुण माया यांच्या अंतदर्शनासाठी पोचले होते.

हे देखील वाचा : 

गद्दारी शब्द त्यांच्या रक्तातच – राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मी राजीनामा देतो, ४० गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला यावं; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान.

शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टाचा कोणताही दिलासा नाही.

Comments are closed.