Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टाचा कोणताही दिलासा नाही.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 16, सप्टेंबर :- पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा मोठा झटका दिला आहे. संजय राऊत यांना ईडीने जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात ईडीने उत्तर दाखल केले आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जास, ईडीनं स्पष्ट विरोध केला आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. सध्या ते आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ईडी कोर्टात राऊत यांच्या वतीने राऊत यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. आणि तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र विशेष न्यायमूर्ती एम.जी.देशपांडे यांनी पुढील आठवड्यातील व्यस्त कार्यामुळे जामीन अर्जावर तत्काळ सुनावणी होणार नाही हे स्पष्ट करत १९ सप्टेंबर पर्यंत संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली, आणि ईडीच्या वकिलांना राऊत यांच्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मी राजीनामा देतो, ४० गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला यावं; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान.

धारावीतील अनधिकृत बांधकामाना पालिकेचे संरक्षण.

Comments are closed.