Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

येत्या २ वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 16, सप्टेंबर :- मुंबई शहरात खड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. मुंबई सारख्या सर्व प्रमुख शहरात हीच परिस्थिती असते. पाऊस सुरू होण्याअगोदर रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम सुरू होते.मात्र पाऊस सुरू झाला की खड्डे पडून रस्त्यांची दुर्दशा होते. नवीन रस्ते बनविणे आणि रस्त्यांची डागडुजी करणे यात भ्रष्टाचार होतो हे आता लपून राहिलेले नाही, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर देखील काम थुकपट्टी लावून करतात. याचा त्रास ना राज्यकर्त्यांना होत, ना कॉन्ट्रॅक्टरना. याचा त्रास होतो कर भरणाऱ्या नागरिकांना !

काल महाराष्ट्र राज्यात १५ सप्टेंबर रोजी ‘अभियंता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुंबईतील प्रभादेवी येथील नाट्य मंदिरात ‘बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता दिन २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या अभियंत्यांना संबोधित करताना मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची आपली योजना जाहीर केली. त्यानुसार येत्या २ वर्षात मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही. असं शिंदे यांनी यावेळी आश्वासन दिले. आता हे आश्वासन पुढे कसे पूर्ण होणार हे येणार काळच ठरवेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामसभांनी सक्षम व्हावे – जिल्हाधिकारी संजय मिना

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वर्धा येथील पल्लवी पाटोदकर बोदिले यांनी जिवशास्त्र या विषयाचे सलग 24 तासाच्या वर अध्यापन करून विश्वविक्रम केला आहे.

Comments are closed.