Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वच्छता ही सेवा मोहीमेत सहभाग नोंदवा – मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशीर्वाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली  १६ सप्टेंबर :-  ग्रामीण भागात दृष्यमान स्वच्छता आणि त्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणची लोकसहभागातून साफसफाई करण्याचे उद्देशाने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” या मोहीमेचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या वर्षी स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमात “गावांची दृष्यमान स्वच्छता” हे घोषवाक्य घेऊन हे अभियान गावागावात राबविण्यात येणार आहे.
जिल्हयात शाश्वत स्वच्छता राहावी व आरोग्य संपन्न गावे निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या सुचनेनुसार दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत स्वच्छता ही सेवा गांवामध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्य व्यापी मोहीम राबविण्याच्या केंद्र शासनाकडुन सुचना आहेत. सदर कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावामध्ये दृश्यमान स्वच्छता, गावातील कचराकुंडया व असुरक्षित ठिकाणाची साफसफाई करणे, कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी (सुका व ओला ) कचरा वेगळे करण्यासाठी जनजागुती करणे, कचरा संकलन व विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे, प्लास्टीकसारखा अविघटनशील कचरा एकत्रित करुन नियोजन करणे, पाणवठयाजवळील परिसर स्वच्छ ठेऊन त्याच्या सोभवताली वृक्षारोपन करावे, एकल प्लास्टीक वापराच्या दुष्परिणामाबाबत सभा आयोजीत करुन या पुर्वी प्लास्टीक वापरास बंदी बाबत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी.

हागणदारी मुक्त अधिक घटकावर संरपच संवाद आयोजीत करणे, घोषवाक्य लेखन, प्रतिज्ञा घेणे, कचरा न करणे, प्लास्टीक बंदी व स्वच्छता या विषयावर वक्तृत्व/ निबंध/ रांगोळी/ सजावट व देखावा स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी गणेश मंडळांना आवाहन करण्यात येत आहे. तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांनी नियोजन करुन व गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य,गावातील सामाजिक संस्था व लोकांनी मोठया प्रमाणात पुढाकार घेवून अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत.असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी,कुमार आशीर्वाद यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

येत्या २ वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.