Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जात वैधता प्रमाणपत्र त्रृटी पुर्ततेसाठीची विशेष मोहीम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,16 सप्टेंबर :- सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात 12 वी विज्ञान शाखेतील व राखीव प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच राखीव संवर्गातून नविन नियुक्ती अथवा पदोन्नतीसाठी सेवा प्रयोजनार्थ प्रस्ताव समितीकडे सादर केलेले आहेत. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर वैधता प्रमाणपत्राबाबत सामान्यत: 5 महिन्याचा आत समिती निर्णय घेते.

परंतु, अनेक प्रस्तावात त्रृटी पुर्तता न झाल्याने व जात व अधिवासाचे सक्षम पुरावे सादर न केल्याने असे प्रस्ताव समितीच्या निर्णयार्थ प्रलंबीत आहेत.अशा सर्व अर्जदारांकरीता दिनांक 20.09.2022 रोजी त्रृटींची पुर्तता करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. तरी ज्या अर्जदारांना गेल्या 3 महिन्यांहून जास्त कालावधी झालेला असल्याने व अशा प्रकरणात समितीला 3 ते 5 महिन्यात निर्णय घेणे आवश्यक असल्याने अशा सर्व उमेदवानी आपले सर्व मुळ पुराव्यांच्या मुळ व छायांकीत प्रतीसह जिल्हा जात प्रमाण पत्रपडताळणी समिती,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकिय आय.टी.आय.चौका जवळ,एल.आय.सी.रस्ता,सोनापूर कॉम्प्लेक्स,गडचिरोली या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली, देवसुदन धारगावे यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.