Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वर्धा येथील पल्लवी पाटोदकर बोदिले यांनी जिवशास्त्र या विषयाचे सलग 24 तासाच्या वर अध्यापन करून विश्वविक्रम केला आहे.

ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वर्धा, 16, सप्टेंबर :- विज्ञान शिक्षिका पल्लवी पाटोदकर बोदिले यांनी सलग 24 तास अध्यापनाचा विश्वविक्रम केला. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ आणि सेल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंगी येथील विद्यापीठाच्या सभागृहात गुरूवार, दि. 15 सप्टेंबर 2022 रोजी तज्ज्ञ ज्युरींच्या उपस्थितीत हा आगळावेगळा उपक्रम राबविला गेला.

काल दिनांक 15 सप्टेंबर 2022 ला पहाटे 5 वाजता जिवशास्त्र या विषयाच्या अध्यापनाला सुरुवात केली आणि आज दिनांक 16 सप्टेंबर 2022 ला पहाटे 5 वाजून 40 मिनीटांनी त्यांनी अध्यापन थांबविले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पल्लवी पाटोदकर बोदिले गत दहा वर्षांपासून जीवशास्त्र हा शिकवितात.विश्वविक्रमाकरिता त्यांनी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जीवशास्त्रातील विविध विषयांच्या सलग तासिका घेतल्या . यादरम्यान सायंकालीन सत्रात त्यांनी वयात येणाऱ्या मुलामुलींबाबत पालकांशी संवाद साधला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

नागपुर येथे मानकापूर क्रीडा संकुलात गडचिरोली जिल्हयाची सैन्य भरती 19 सप्टेंबर रोजी

प्रसूतीसाठी नेताना वाटेतच आणखी एक मृत्यू

Comments are closed.