Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मी राजीनामा देतो, ४० गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला यावं; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान.

खोके सरकारमुळे महाराष्ट्रातील तरुण रोजगारापासून वंचित - आदित्य ठाकरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रत्नागिरी, 16, सप्टेंबर :- शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा शुक्रवारी बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघात होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी पासून तरुणांच्या रोजगाराच्या मुद्यावरून खडेबोल सुनावले आहेत. खोके सरकारमुळे महाराष्ट्रातील तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, अशी सडकून टीका करत आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री कोण असा सवाल जमलेल्या शिवसैनिकांना केला. यावेळी शिवसैनिकांनी गद्दार अशी जोरदार घोषणाबाजी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दारी झाली की नाही झाली? जिथे मी गेलो तिथे लोक उभे असतात महिला उभ्या असतात. कोकणात माझा तिसरा दौरा आहे. जिथे जिथे स्थानिक आमदारांनी गद्दारी केली तिथे लोकांना जाऊन विचारत आहे कि त्यांनी केलं ते योग्य केलं का? मी तुम्हाला विचारतोय की त्यांनी जे केलं ते योग्य आहे का? अनेक लोक शिवसंवाद यात्रेत येतायत. गर्दी बघितल्या नंतर मला त्यांच्याकडून निरोप येऊ लागले की गद्दार बोलू नका मग यांना बोलायचं काय? ५० खोके एकदम ओके हे महाराष्ट्रात सर्वत्र गेलेलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

खोके सरकार अजून दाखवू शकलं नाही की काम केलंय. लिंक रोडची पाहणी करायला गेले तेव्हा त्यांना काहीच माहित नव्हती. मुंबईतील दवाखान्याची संकल्पना आमचीच. कुठेही महाराष्ट्रातील जनतेकडे याचं लक्ष नाही आहे. आम्ही विधानभवनाच्या पायऱ्यावर उभे राहून बोलत होतो ५० खोके एकदम ओके त्यावेळी काहीजण म्हणत होते तुम्हाला हवेत का? उद्धव साहेबांचं सरकार पाडलं, बाळासाहेबांचे सरकार पाडलं. मी पहिल्यांदा विधानभवनात बघितलं की सरकारमध्ये असलेले पोस्टर घालून उभे केले होते. माझ्यावर टीका करण्यासाठी त्यांना तिथे उभ केल होत याच मला हसू येत होतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

ज्या दिवशी निवडणुका लागतील तेव्हा सर्व समोर येणार आहे. वेदांता फॉक्सकॉनबद्दल उद्योगमंत्र्यांना काहीच माहीतच नाही. ही गुंतवणूक मी मोठी मानत नाही पण एक लाख रोजगार यामुळे निर्माण होणार होते. हा प्रस्ताव महाराष्ट्रात कसा येणार यावर माझं लक्ष होतं. कंपनीने ठरवलं की आम्हाला महाराष्ट्रातच यायचं आहे. गद्दारांनी हे सरकार पाडलं पण त्यानंतर सरकार आलं पण त्यांनी पाठपुरावा केला नाही. शंभर टक्के प्रकल्प येणार होता तो गेला कसा हे कोणालाच माहिती नाही पण त्यांच्याकडून उत्तर देणं सोडा पण आरोप केले जात आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामसभांनी सक्षम व्हावे – जिल्हाधिकारी संजय मिना

प्रसूतीसाठी नेताना वाटेतच आणखी एक मृत्यू

Comments are closed.