Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हा कोणता राजधर्म ? राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल.

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 23, सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता आल्यापासून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा वरपे यांच्याकडून करण्यात आला आहे. यावरुन वरपे यांनी शिंदे पितापुत्रांवर निशाणा साधला आहे.

खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे .हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?, असे रविकांत वरपे यांनी ट्विटमध्ये म्हटले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे खुर्चीत बसले असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. यावरुन अनेकजण राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. मात्र, हे छायाचित्र वर्षा बंगल्यावरच टिपण्यात आलेले आहे किंवा नाही, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही.

मी दोन टर्मचा खासदार आहे. कुठे बसायचं, कुठे नाही हे मला चांगलंच समजतं. माझ्यावर राजकीय हेतुने आरोप केले जात आहेत, असा पलटवार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केलाय. श्रीकांत शिंदेवर झालेल्या या आरोपावर ते काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वाचं लक्ष असतानाच त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

मुंबई – गोवा महामार्ग अजूनही बंद !

आर्मीच्या परीक्षेसाठी आलेल्या तरुणाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.