Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घरी उपचार घेणा-या नागरिकांचे नागपूर म.न.पा. तर्फे सर्वेक्षण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

नागपूर, दि.२ डिसेंबर: नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उच्च रक्तदाब, अस्थमा, क्षयरोग, कर्करोग, एडस्, कुष्ठरोग,किडनी इत्यादी आजाराचे घरी उपचार घेणारे नागरिकांची तपासणी सुरु केली आहे. आतापर्यंत १४९१५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
महानगरपालिकेकडे घरी उपचार घेणारे ८१४८४ नागरिकांची यादी आहे. “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” मोहिमे अंतर्गत मनपा आरोग्य विभागाचे सहकार्याने सर्वेक्षण करण्यात आले होते. आता पुन्हा या यादी नुसार नागरिकांच्या प्रकृतीची तपासणी केली जात आहे तसेच त्यांना आवश्यक औषधोपचाराबददल सांगण्यात येत आहे. नागरिकांना विटॅमिन सी व झिंक च्या गोळयासुध्दा दिल्या जात आहे, अशी माहिती अतिरिक्त श्री. राम जोशी यांनी दिली.
मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी घरी उपचार घेणा-या नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार प्रत्येक झोनमध्ये ही तपासणी करण्यात येत आहे. मनपा आरोग्य विभागाने २५ नोव्हेंबर पासून सर्वेक्षणाची सुरवात केली आहे. १ डिसेंबर पर्यंत उच्च रक्तदाबाचे ९६०६, अस्थमाचे ४८१, क्षय रोगाचे ३३, कर्क रोगाचे ७४, एडस चे ९, मधुमेहाचे ६७३३, हदय रोगाचे २६१, कुष्ठ रोगाचे १३, स्थुलतेचे ७, कोव्हीड नंतरचे ११८ रुग्णांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे, असे नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांनी सांगितले.
सर्वेक्षणामध्ये मिळालेल्या माहितीनुसार घरी उपचार घेणा-या रुग्णांची संख्या या प्रकारे आहे. लक्ष्मीनगर झोन १११८४, धरमपेठ झोन १६५१८, हनुमाननगर झोन ७१२१, धंतोली झोन ८८३०, नेहरुनगर झोन ११९६२, गांधीबाग झोन ८६६६, सतरंजीपूरा झोन ३४८१, लकडगंज झोन २४६१, आसीनगर झोन ६०५३ आणि मंगळवारी झोनमध्ये ५२०८ रुग्ण आहेत.
आतापर्यंत मनपाची चमू लक्ष्मीनगर झोनमध्ये ७८०, धरमपेठ झोनमध्ये ३५८२, हनुमाननगर झोनमध्ये ६४५, धंतोली झोनमध्ये ९५७, नेहरुनगर झोनमध्ये ३८३, गांधीबाग झोनमध्ये ३३०६, सतरंजीपूरा झोनमध्ये ८३, लकडगंज झोनमध्ये २३०१, आसीनगर झोनमध्ये १५८७ आणि मंगळवारी झोनमध्ये १२९१ नागरिकांपर्यंत पोहोचली आहे.

Comments are closed.