Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करुन अहवाल सादर करावा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नाशिक, 10 एप्रिल :- गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे, वादळी वारा आणि मुसळधार पावसानं रब्बी पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळं राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळं अयोध्येचा दौरा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आहे. सटाणा तालुक्यातील निताने, बिजोटे, आखतवाडे शिवारातील नुकसानग्रस्त शेतीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली असून नासाडी झालेल्या शेतीपिकांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला जारी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार उपस्थित होते.

नाशिक जिल्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाने, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराने, तर सटाणा, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापुर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी दि. 8 एप्रिल,2023 रोजी बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी., मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाण प्रांत बबन काकडे, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी पी.एस.कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डांळीब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

हे पण वाचा :-

बसच्या केबिनला लागली आग, नागरिकांच्या मदतीने प्रवाशांनी खिडकीतून घेतली उडी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.