Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शोधग्राम ‘सर्च’ रुग्णालयात ३७ रुग्णावर शस्त्रक्रिया

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात दिनांक- २२ ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या माध्यमातून गडचिरोलीसह चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, कांकेर (छत्तीसगड) जिल्ह्यातून आलेल्या ३७ रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

  सर्चद्वारे २००५ पासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्या जाते. गत पाच ते सहा महिन्यातील सर्चमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णापैकी शस्त्रक्रियेची गरज असलेल्यासाठी दिनांक- २२ ते २३ मार्च २०२३ दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात आली. यात गर्भाशयातील अंडाशयाच्या गाठी, शरीरावरील गाठी, अपेंडिक्स, हर्निया-हायड्रोसील ईत्यादी प्रकारच्या ३७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या शस्त्रक्रियेसाठी स्पेशालिस्ट सर्जन डॉ. राजेश सिंघवी (जनरल सर्जन) व टिम नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प पार पाडण्यात आला. सर्चच्या संस्थापक डॉ. राणी बंग व  डॉ. राजेश सिंघवी यांच्या नेतृत्वात सदर शिबीर घेण्यात आले. सर्चच्या  रुग्णालय प्रशासकीय चमूने या शिबिराची उत्तम व्यवस्था सांभाळली.

 

हे देखील वाचा : 

पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई ; तीन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल

मेड्डीगड्डा प्रकल्पमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी सिरोंचा तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.