Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गावातील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यावर चर्चा

गावातील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यावर चर्चा -सिंगनपल्ली येथे सघन बैठक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 17 जून – चामोशी तालुक्यातील अतिदुर्गम गाव सिंगनपल्ली येथे सघन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेजारील गावातील अवैध दारूविक्री व वाढते व्यसनाचे प्रमाण कमी करण्यावर चर्चा करण्यात आली.सिंगनपल्ली येथे गाव संघटनेच्या अथक परिश्रमातून अवैध दारूविक्री बंद होती. परंतु, परंतु शेजारी गावात आणि शेतात चोरून विक्री सुरू असल्याने सदर गावातील व्यसनी लोकाचे प्रमाण वाढत होते. ही समस्या सघन बैठकीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी मांडली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गाव संघटना, ग्रामस्थ व मुक्तिपथ तालुका चमूच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

सोबतच ग्राम पंचायत समिती व इतर समिती सदस्यांच्या उपस्थितीत गाव विकास , पेसा कायदा, दारु दुष्परिणाम सत्र घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी किशोर वयीन मुली, माता आरोग्य शिक्षण आणि व्यसन उपचार शिबिराचे नियोजन करण्यात आले. दारू सोडण्याची इच्छा असलेल्या रुग्णांनी व्यसन उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी बैठकीमध्ये पोलिस पाटील अशोक कन्नाके, अंगणवाडी सेविका जरणा कविराज, आशावर्कर अर्चना गावडे, गाव संघटन महिला, मुक्तीपथ तालुका संघटक आनंद इंगळे आणि स्पार्क कार्यकर्ती सोनी सहारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.