Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी यांना मरणोत्तर २०२० चा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • प्रसिद्ध गायक शब्बीर कुमार यांना मोहम्मद रफी पुरस्कार
  • तेराव्या वर्षाच्या मोहम्मद रफी पुरस्काराची भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांच्याकडून घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई डेस्क, दि. २२ डिसेंबर : वो मुकंदर का सिकंदर, तेरे बिना भी क्या जीना, जिंदगी का सफर, और इस दिल में क्या रखा है अशी सिनेसंगीत जगतात अजरामर गीतांनी रसिकांना बेधुंद केले, ठेका धरायला लावले, कधी डोळ्यात पटकन पाणी आणले असे ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. तर प्रसिद्ध गायक शब्बीर कुमार यांना रफी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मोहम्मद रफी यांच्या ९६ व्या जयंती निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज येथे केली. आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे तेरावे वर्ष असून ज्येष्ठ संगीतकार आनंदजी कल्याणजी जोडीतील कल्याणजी शाह यांना मरणोत्तर देण्‍यात येणा-या जीवन गौरव पुरस्‍कार एक लाख रू. धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे स्वरूप असून, शब्बीर कुमार यांना देण्‍यात येणारा ५१ हजार रू. धनादेश आणि स्‍मृतीचिन्‍ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. गेल्या १२ वर्षात मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६ वा. सुरू होणार असून केरळ चे राज्यपाल महामहीम आरिफ मोहम्मद खान प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन सहभागी होणार आहेत. यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे ‘फिर रफी’ या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ करणार आहेत. या कार्यक्रमला प्रवेश विनामूल्य प्रवेशिकांवर देण्यात येणार आहे. कोविडमुळे आरोग्याचे नियम, मास्क, सोशल डिस्टसिंग पळून यावर्षी हा सोहळा साजरा होणार आहे.

यापुर्वी संगीतकार लक्ष्मीकांत, प्यारेलाल, आनंदजी, मरणोत्तर श्रीकांत ठाकरे, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, उदित नारायण, खय्याम, सुदेश भोसले या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही यापुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.