Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मनपा शाळांमध्ये जलपुनर्भरण करणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, २२ डिसेंबर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रात  ‘माझी वसुंधरा अभियान’ सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत मनपाच्या सर्व शाळांमध्ये जल पुनर्भरण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी आज दि. २२ डिसेंबर रोजी दिले.

अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्या कक्षामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी हरित आच्छादन आणि जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, वायू प्रदूषण नियंत्रण, जलसंवर्धन, रेन वाटर हार्वेस्टिंग व परकोलेशन, नदी, तळे व नाले यांची स्वच्छता, सांडपाणी, मैला व्यवस्थापन व प्रक्रिया, ऊर्जा, पर्यावरण सुधारण व संरक्षणासाठी जनजागृती आदी विषयांचा आढावा घेतला. नागपूर शहरातील शासकीय इमारती, मेट्रो स्टेशन, उद्याने, शाळांमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील अशा सर्व इमारतींची माहिती सादर करणे तसेच मनपाच्या सर्व शाळांमध्ये जलपुनर्भरणाच्या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी दिले. जलपुनर्भरण अंतर्गत शोष खड्डे तयार करुन त्यात पाणी जिरविण्यात येणार आहे. यासंबंधी शिक्षणाधिका-यांसह सर्व झोनस्तरावर कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.