Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कंत्राटदाराचा मृत्यू; मालकावर गुन्हा दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. २३ डिसेंबर: हिंगणा एमआयडीसीतील कंत्राटदाराच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी कंपनी मालक आणि त्याच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ डिसेंबर रोजी घडली होती. 

संतोष मुलचंद हनवत (३९) रा. विश्वविनायक नगर, वाघदरा, इसासनी असे मृतक कंत्राटदाराचे नाव आहे. तर साहील जैन असे कंपनी मालकाचे आणि सुनील बोडखे असे व्यवस्थापकाचे नाव आहे. संतोष एमआयडीसी हद्दीतील सीआरपीएफ गेट, हिंगणा रोड येथील मेटल फेब कंपनीमध्ये कंत्राट होते. कंपनीत क्रेनद्वारे लोखंडी अँगल उचलण्याचे काम सुरू होते. कंत्राटदार संतोष ११ डिसेंबर रोजी अँगल क्रेनमधुन काढत असताना तो अँगल सुटून संतोष यांच्या छातीवर पडला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरीता लता मंगेशकर हॉस्पीटल येथे नेले तेथून विवेका हॉस्पीटल, नाईक लेआउट, सुभाषनगर येथे भरती केले असता दुसऱ्या दिवशी १२ डिसेंबर रोजी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रकरणी पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्युची नोंद केली होती. पोलिसांच्या चौकशीत असे निष्पन्न झाले की, संतोष हे कंपनीमध्ये कामगार नसून फेब्रिकेशन सुपरवायझर व ठेकेदार होते. त्यांना क्रेन चालविण्याचा अधिकार नाही. तसेच त्यांच्याजवळ क्रेन चालविण्याचा परवाना व क्रेनचे कोणतेही ज्ञान नाही. हेल्मेट, कवचसह सुरक्षेची कोणतीही वस्तू त्यांनी घातली नसता कंपनीचा मालक साहील जैन आणि व्यवस्थापक सुनील बोडखे यांनी संतोष यांना क्रेन चालविण्यास सांगितले. कंपनी मालक व व्यवस्थापकाने यात निष्काळजीपणे व हयगय केल्यामुळे संतोष यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी वंâपनी मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.