Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रीय पथक शेतकऱ्यांचा बांधावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, २५ डिसेंबर : पीक नुकसानीची पाहणी करण्याकरिता केद्रीय पथक २४ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांचा बांधावर पोहोचले. तब्बल पाच महिन्यानंतर केंद्रीय पथकाचा दौरा सुरू झाला.

नागपूर विभागात यावेळी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.  मात्र या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्याकरिता नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून गुरुवारी या पथकाचा दौरा सुरु झाला. या पथकाने दुपारपर्यंत कामठी, पारशिवनी, मौदा तालुक्यातील सोनेगाव राजा, निलज, सिंगारदीप आदी गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त पुलांसह पायाभूत सुविधांचीही पाहणी केली.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऑगस्ट महिन्यात तसेच त्यानंतर झालेल्या पिकहानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय पथक पूर्व विदर्भाच्या  दौऱ्यावर आले आहे. यामध्ये गुरूवार २४ डिसेंबर रोजी पहिले पथक नागपूर जिल्ह्याची तर दुसरे पथकांनी गडचिरोली जिल्ह्याची पाहणी केली आहे.  यामध्ये पहिले पथक सकाळी ९.१५ ते १०.०० या कालावधीत कामठी, साडेअकराला पारशिवनी तर दुपारी एकला मौदा तालुक्याची पाहणी केली. पाहणी आटोपून दुपारी ४.३० वाजता हे पथक भंडारा जिल्ह्याकडे प्रस्थान झाले. आज २५ डिसेंबर रोजी हे पथक चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील काही गावांना भेट देणार आहे. शनिवार २६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात या अनुषंगाने आढावा बैठक होणार आहे. 

Comments are closed.