Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र ‘जिल्हा वनहक्क समिती कक्षाची’ स्थापना

विवेक पंडित यांच्या हस्ते ‘जिल्हा वनहक्क समिती’ कक्षाचे उद्घाटन…

वनहक्काबाबत सकारात्मक भूमिका घेऊन वनहक्क दाव्यांचा निपटारा करण्यासाठी प्राधान्य दिल्याबाबत विवेक पंडित यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे केले अभिनंदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पालघर, दि.९ जानेवारी: वनहक्क दाव्यांचा नियोजनबद्ध पद्धतीने निपटारा करण्यासाठी पालघर जिल्हाधिकरी कार्यालयात स्वतंत्र  ‘जिल्हा वनहक्क समिती कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे. या  जिल्हा वनहक्क समिती कक्षाचे उदघाटन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, तसेच निवासी जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांच्यासह आदी. उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डॉ. माणिक गुरसळ यांनी पालघर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेताच वनहक्काबाबत सकारात्मक भूमिका घेऊन वनहक्क दाव्यांचा निपटारा करण्यासाठी प्राधान्य देत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र ‘जिल्हा वनहक्क समिती कक्षा’ ची स्थापना केली. याबाबत विवेक पंडित यांनी जिल्हाधिकारी आणि त्यांचा सहकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वनहक्कदावे  धारकांना ताब्यात असलेल्या जमिनीच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र देण्यात आले. पालघर जिल्ह्यात सप्टेंबर २०२० अखेरपर्यंत  जिल्हास्तरीय वनहक्क समिती कडील एकूण ७७८४ दावे  प्रलंबित असून, त्यापैकी एकुण 3024 वनहक्क दाव्यांना अंतिम मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच उपवनसंरक्षक जव्हार व डहाणू यांच्याकडे १९३३  दावे  प्रलंबित आहेत.  तर उर्वरीत २७९७ दाव्यांवर जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून कार्यवाही सुरु असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली तसेच उर्वरित सर्व वनहक्क दाव्यांचा  निपटारा  ३१  मार्च २०२१ पर्यंत करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. 

Comments are closed.