Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले खासदार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

परतीच्या  पावसामुळे झाले शेतकऱ्यांचे  नुकसान.पहाणी केल्यानंतरसर्वेक्षण करण्याचे प्रशासनाला निर्देश .

लोकस्पर्श न्युज नेटवर्क 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली ०१नोव्हें :_अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे गडचिरोली जिल्हात अनेक ठिकाणी धान व इतर पिकांचे  नुकसान झाले. मात्र प्रशासनाकडून सर्व्हेक्षण करण्यात आले नाही .त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत  गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी चामोर्शी तालुक्यातील दौरा करून  नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली. यामध्ये कुनघाडा, मालेरचक, कुनघाडा, जोगना परिसरात शेतीच्या बांधावर जाऊन पाहिले असता प्रत्यक्ष धानपिक पूर्णतः अवकाळी पाऊसासह वादळ वाऱ्याने धान खाली पडलल्याने हाती आलेल्या  उभे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला पेरणीसह केलेला  खर्च बघता ५० टक्केही उत्पादन हातात येणार नसल्याचे शेतकऱ्यांनी खा. नेते यांच्या समक्ष बोलून दाखविले.

शेतकऱ्यांची अडचण व प्रत्यक्ष पीकाची  परिस्थिती लक्षात घेऊन सर्व नुकसानग्रस्तांच्या शेतीचे तात्काळ सर्व्हेक्षण करून अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश तालुका प्रशासनास दिले . पीकविमा साठी उद्भवलेल्या सर्व अडचणी दूर करून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले. सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधून अडचणी संदर्भात कागदपत्रांची पूर्तता करून पीक विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात कृषी विभाग, तलाठी, ग्रामसेवक किंवा तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी टाळाटाळ करून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिल्यास खपवले जाणार नाही याचीही नोंद घ्यावी असे स्पष्ठ खा . अशोक नेते यांनी ठणकावले .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी खा.अशोक नेते यांच्या नुकसान ग्रस्त भागाच्या दौरा दरम्यान जिप चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, भाजपचे आदिवासी आघाडी चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, ओबीसी मोर्चा चे जिल्हा महामंत्री भास्करजी बुरे, गडचिरोली चे उपजिल्हाधिकारी तथा चामोर्शीचे तहसीलदार अवतरे, व कृषी विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.