Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बौद्ध धम्म शांतीचे प्रतीक – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Get real time updates directly on you device, subscribe now.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील कराळी गावात बुद्ध विहाराचे उदघाटना प्रसंगी केले प्रतिपादन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उमरगा, दि. १७ जानेवारी: महाकारूणीक तथागत गौतम बुद्धांनी जगाला दिलेला बौद्ध धम्म हा शांतीचे प्रतीक आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील कराळी गावात बुद्ध विहाराचे उदघाटन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजा ओव्हाळ सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलीय समूहात संघर्ष शिगेला पोहोचला होता. तेंव्हा रोहिणी नदीचे पाणी शाक्य आणि कोलियांनी समान वाटप करावे त्यासाठी संघर्ष रक्तपात हिंसा करू नये असा आग्रह सिद्धार्थ गौतम यांचा होता. रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य कोलीयांच्या संघर्षामुळे सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला. त्यानंतर केलेल्या साधनेतून ते शाक्यमुनी तथागत भगवान बुद्ध झाले. त्यांनी आपल्या बौद्ध धम्मातून मानवतेचा समतेचा विज्ञानाचा ज्ञानाचा शांतीचा अहिंसेचा विचार जगाला शिकविला. जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. त्यामुळे जगभर बौद्ध धम्म प्रसार वाढत आहे. असे प्रतिपादन यावेळी ना. रामदास आठवले यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ना. रामदास आठवले उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी हैद्राबाद विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर ते थेट उमरगा येथे पोहोचले. त्यानंतर उमरगा येथील कराळी गावात बुद्ध विहाराचे उदघाटन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यानंतर उमरगा येथील महात्मा फुले सहकारी पतसंस्थेचे उदघाटन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यात ना. रामदास आठवले हे उमरगा आणि निलंगा या तालुक्यांचा  दौरा करून नांदेडला रवाना होणार असून उद्या दि. 18 जानेवारी रोजी नांदेडच्या बिलोली येथे  मातंग समाजाच्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. तिच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.