Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुलीच्या मृत्युच्या धक्क्याने बापाला हृदयविकाराचा झटका, बाप-लेकीवर एकाचवेळी वेळी अंत्यसंस्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

शिक्षण झालं …नोकरीही सुरू झाली.. लग्नही ठरलं ..पण मुलीला कॅन्सरने पछाडलेल्याचे कळताच संपूर्ण कुटुंबच हादरुन गेले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.. मृत्यूचा हा धक्का वडिलांना सहन करता आला नाही . वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि कदम कुटुंबावर आभाळच कोसळले. बाप मुलीवर एकाच वेळी अंत्यसंस्काराची वेळ आली.

मुंबई डेस्क दि ०३ फेब्रुवारी : मूळचे बसणी येथील नंदकुमार कदम जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. गेली जवळपास ते पंचवीस वर्ष जिल्हा परिषद भवनात विविध विभागात कार्यरत होते .मात्र नियतीने त्यांच्या कुटुंबावर एक प्रकारे घालाच घातला आहे. त्यांची मोठी मुलगी प्राजक्ता (28) हिने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका खाजगी नोकरीला लागली होती . त्याचबरोबर तिचे लग्न ठरले होते यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते .मात्र आनंद हा फार वेळटिकला नाही . एका वर्षापूर्वी प्राजक्ता अचानक आजारी पडली होती तपासणी केली असता तिला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कुटुंब अक्षरशः हादरून गेले होते .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या परिस्थितीतही न डगमगता प्राजक्ता वर उपचारासाठी वडिलांची धडपड सुरू होती . दोन दिवसापूर्वी घरात अचानक तिला फिट आली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नंदकुमार कदम यांनी तिला उपचारासाठी डॉक्टरकडे नेण्यासाठी हालचाल सुरू केली. मात्र त्यांच्या हातावर तिने अखेरचा श्वास घेतला . तिचा मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर झाला लाडक्या कन्येचा मृत्यू पाहिल्याचा धक्का नंदकुमार कदम यांना इतका बसला की ते जागेवरच खाली कोसळले. डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. अखेर दोघांवर शोकाकुल वातावरणात एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले होते .

Comments are closed.