Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अतिवृष्टीच्या पुरात वाहून गेलेल्या बार्शीच्या अजय चौधरी यांच्या सांगाडा चार महिन्यांनी सापडला

बार्शीचा बाजार समिती तोलार म्हणून होते कामाला.

14 ऑक्टोंबर 2020 रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी तो काम संपून फपालवाडी रोडवर ओढयानजीक घडली घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोलापुर दि.०३ फेब्रुवारी  – सोलापूर जिल्हात अतिवृष्टीने अनेकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला , गुरेढोरे वाहून गेली, मनुष्यहानी झाली या नैसर्गिक हाणीत कामावरून घराकडे निघालेल्या तरुण महापुराच्या पाण्यात वाहून गेला आता चार महिन्यानंतर त्याचा सांगाडा एका झाडास अडकून पडल्याच्या पोलिसांना आढळून आले. अजय चौधरी असे या तरुणाचे नाव आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बार्शी – तुळजापुर रोड वरील अशोक हॉटेल चे मालक महेंद्र साबळे यांना दिसला त्यांनी त्याचे नातेवाईक किशोर चौधरी यांना फोन करून कल्पना दिली . त्यानंतर कुटुंबातील लोकानी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली पाहणी करताना दाट असलेल्या चीलारीच्या झाडाला अडकलेल्या सांगाडा दिसला. मयताची पत्नीने मानेच्या हाडांमध्ये गुंतलेला शर्ट पाहून ज्या दिवशी वाहून गेले त्या दिवशी तोच शर्ट त्यांच्या अंगावर ही होता असे सांगितले शिवाय या सांगाड्याची बांधणी पतीच्या शरीरायष्टीशी मिळतीजुळती असल्याचे पत्नीने हा सांगाडा आपल्या पतीचा असल्याचे सांगितले.

या घटनेतील मयत हा बाजार समितीत तोलार म्हणून काम करत होता 14 ऑक्टोंबर 2020 रोजी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी तो काम संपून फपालवाडी रोडवरील ओढयानजीकच्या राणा कॉलनीत असलेल्या घरी या ओढयातील पाण्यातून जात होता. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने तो जाताना पाण्यात पडून वाहून गेला नाकातोंडात पाणी जाऊन मयत झाला .तपास न लागल्याने पोलिसात तो वाहून गेल्याची नोंद झाली होती. मात्र या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकास तहसीलदार यांनी भेट ही दिलेली होती. परंतु अद्याप ही शासनाची कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याची नातेवाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

Comments are closed.