खा. अशोक नेते यांची दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या केंद्रीय उपभोक्ता सलाहकार समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 2 फेब्रुवारी: भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांची दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या केंद्रीय उपभोक्ता सलाहकार समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हादजी जोशी यांनी केली आहे.
खासदार अशोक नेते यांची केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्य पदांवर नियुक्ती झाल्याने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासह चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील रेल्वेचे प्रश्न, रेल्वे स्टेशन च्या समस्या, अडचणी तसेच अंडर ब्रिज, फूट ओव्हर ब्रिज च्या संबंधित अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे.
खा. अशोक नेते यांच्या नियुक्ती बद्दल चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. कीर्तिकुमार भांगडिया, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ देवरावजी होळी, आरमोरी चे आमदार कृष्णाजी गजभे, माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज आत्राम, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, जिल्हा महामंत्री ( संघटन) रविंद्रजी ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिप चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, अनुसूचित जनजाती मोर्चा चे प्रदेश सदस्य संदीपजी कोरेत, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिप सदस्य नानाभाऊ नाकाडे, तसेच सर्व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments are closed.