Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी! ५४ प्रवाशांनी भरलेली बस ३० फूट खोल कालव्यात कोसळली; बचावकार्य सुरु

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. १६ फेब्रुवारी: मध्यप्रदेशात भीषण अपघात झाला असून ५४ प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु करण्यात आलं. सात प्रवाशांना वाचवण्यात आलं असून इतरांचा शोध घेतला जात आहे. बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये एकूण ५४ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंत सात प्रवासी पोहत बाहेर आले तर चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कालवा ३० फूट खोल असल्याने पूर्ण बसच त्यात बुडाली आहे. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बसचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी घटनेची दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्य़ांशी चर्चा केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.