Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निती चांगली असेल तर नियती बदलते: पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, 22 फेब्रुवारी: निती आणि नियत चांगली असेल तर नियती देखील बदलते असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानांच्या हस्ते सोमवारी आसाममधील काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, आसाममध्ये पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहेत. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करायचे असेल, तर आपले सामर्थ्य आणि क्षमता या दोन्हींमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. धोरणे चांगली असतील, ती राबवण्यासाठी वृत्ती चांगली असेल, तर परिस्थितीही बदलते. तसेच आसाम वासियांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी काम केले जात आहे. विकासाचे डबल इंजिन मजबूत करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आसामच्या जनतेला केले. दशकांपासून राज्य करणाऱ्यांनी दिसपूरला दिल्लीपासून नेहमीच दूर ठेवले. त्यामुळे आसामचे मोठे नुकसान झाले. मात्र, दिल्ली आता दिसपूरसाठी दूर राहिलेली नाही. आसामच्या जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आसाममध्ये लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आसाममधील जनतेला मूलभूत सुविधा मिळतील. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. यामुळे आसामसह देशाच्या विकासाला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळेल, असा आशावाद पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, या मंत्रावरच केंद्रातील सरकार काम करत आहे. केंद्र सरकारने भेदभाव दूर करण्यावर भर दिला आहे. देशवासीयांना वीज, गॅस, इंटरनेट देण्याचे काम केंद्र सरकारने प्रभावीपणे केले आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत या सोयी, सुविधांमध्ये अनेक पटींमध्ये वाढ झाली आहे. गरिबांचा जीवनस्तर सुधारावा हेच आमचे ध्येय आहे आणि नवीन सुधारणांमुळे फायदा मिळेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

Comments are closed.