Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला येणार, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर तब्बल १४ दिवसानंतर करणार जाहीर कार्यक्रम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाशीम, दि. २२ फेब्रुवारी: गेले 14 दिवस नॉट रीचेबल असलेले मंत्री संजय राठोड हे उद्या पोहरादेवीला येणार असल्याची माहिती देवस्थानाच्या महंतांनी दिली आहे. त्यानंतर संजय राठोड समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रिय झाले असून “चलो पोहरादेवी चलो पोहरादेवी” ही मोहिम व्हॉट्सअॅपवर राबविण्यात येत आहे. मात्र जाहीर कार्यक्रमावर सध्या बंदी असल्यानं राठोड येथे येणार का आणि आलेच तर हा कार्यक्रम कसा असेल याबद्दल प्रश्नचिन्हं आहे.

महंत तर संजय राठोडच्या बाजूने समोर आले, पण बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज उद्या राठोडला आशीर्वाद द्यायला हजर नसणार आहे. उद्या सर्व महंतांनी मिळून राठोड येणार हे ठरवले, पण पोहरादेवीचे सर्वात मोठे, म्हणजेच धर्मगुरू बाबूसिंग महाराजच उपस्थित राहणार नाहीत. ते कालच मूर्ती स्थापनेच्या कार्यक्रमाला कर्नाटकात गेले आहेत आणि उद्या ही नसणार आहे. त्यामुळे पोहरदेवीला येणाऱ्या संजय राठोडला धर्मगुरूंचा आशीर्वाद मिळणार कसा? अशी चर्चा सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बंजारा समाजाचे व्हाट्सअॅपवर ग्रुप्स झाले संजय राठोडच्या स्वागतासाठी सक्रिय झाले आहे. गोर माटी, सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र बंजारा संघटक नावांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवरून हे मेसेज व्हायरल करण्यात आले आहे. “सर्वांनी संजय राठोड यांच्या मागे उभे राहावे नाहीतर समाजाचे नुकसान होईल, त्यामुळे पोहरादेवीला उद्या यावे”, “प्रत्येकाने 10 लोकांचा ग्रुप बनवावा आणि पोहरादेवीला निघावे. तसेच आपापल्या ग्रुपचे फोटो पाठवावे”, अशा आशयाचे मेसेज ग्रुपवर व्हायरल होत आहे.

23 फेब्रुवारीला मंगळवारी, सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संजय राठोड हे इथं संपूर्ण कुटुंबासमवेत येणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.  इथं विधीवत पूजा संपन्न झाल्यानंतर आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर धर्मपीठाला भेट दिल्यानंतर ते या ठिकाणहून निघतील असंही सांगण्यात आलं आहे. तेव्हा आता या ठिकाणी राठोड माध्यमांशी संवाद साधण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास ते नेमकं काय बोलणार याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.