Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: वऱ्हाडी मंडळीचा मेटॅडोर उलटून ४ जण ठार तर २५ जण गंभीर जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्‍यातील कच्चेपार गावाजवळ घडली घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. २५ फेब्रुवारी:  लग्न आटोपून परत निघालेल्या वऱ्हाडी मंडळीचा मेटॅडोर उलटून झालेल्या अपघातात ४ जण जागीच ठार झाल्याची घटना सिंदेवाही तालुक्‍यातील कच्चेपार गावाजवळ गुरुवारी दुपारी घडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रत्नापूर येथे लग्न आटोपून हा मेटॅडोर (क्र. एम. एच. ३१ पी क्यू  ३९१५ ) सिंदेवाहीतील एकरा येथे जात होती. या गाडीचे टायर फुटल्याने वाहन चालकाचे नियंत्रण बिघडून हि मेटॅडोर झाडावर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की हा मेटॅडोर संपूर्णपणे उलटला व त्यातील वर्‍हाडी मंडळी एकमेकांवर आदळून दबली गेली.  अपघातग्रस्त व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.  या अपघातात दोन महिला व दोन पुरुष जागीच ठार झाले. तर 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. या परिसरात सर्वत्र सामान विखुरलेले व रक्ताचा सडा पडल्याचे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या घटनास्थळापासून जवळच रेल्वेचे फाटक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी हे फाटक ओलांडून जावे लागणार होते. तेथून जात असलेल्या मालगाडीला नागरिकांनी काही काळासाठी रोखून धरले व जखमींना रुग्णवाहीकेतून रेल्वेरूळ ओलांडून नेण्यासाठी मदत केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.