Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुसाईड नोट लिहून एसटी कंडक्टरची बसमध्ये आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

4 पानांच्या सुसाईड नोटमध्ये कंडक्टरनं काय लिहून आत्महत्या केली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड 26 फेब्रुवारी:– एसटी कंडक्टरनं गाडीमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. एसटीतील घंटा वाजवण्याच्या दोरीनं गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. 54 वर्षीय संजय जानकर यांनी आज पहाटेच्या सुमारास आयुष्य संपवलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

4 पानांची सुसाईड नोट लिहून जानकर यांनी आत्महत्या केली. ते नांदेडमधील माहूर आगारात कार्यरत होते. त्यांच्याजवळील तिकीटामध्ये मोठी तफावत आढळली होती. त्यामुळे कामावरून आपल्याला काढलं जाईल या भीतीनं धक्कादायक पाऊल उचललं. 

 संजय जानकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये परिवहन मंडळाला जबाबदार धरलं आहे. तिकिट काढण्याचे मशीन सतत बिघडतं. त्यामुळे तिकीटांमध्ये तफावत आढळून आली आहे.  काही चूक नसताना निलंबन होईल, समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.