Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुष्काळी क्षेत्रात 2100 पपईचे झाडापासून घेतले 22 लाखाचे उत्पादन..

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्याची अनोखी यशोगाथा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रविकुमार मडावार,

माळशिरस 23 सप्टेंबर :-  माळशिरस तालुक्यातील दुष्काळी पट्टा असणाऱ्या कन्हेर गावामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याने चक्क पपईची 2100 झाडे फुलवली. यातून या शेतकऱ्याला साधारण 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे दुष्काळी पट्ट्यात असूनही शेतकऱ्याने पारंपारिक शेतीतून पिकवलेल्या पपईला कलकत्ता आणि चेन्नई येथून मोठी मागणी आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील कन्हेर गावच्या बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूने आपल्या पावणे दोन एकर शेतीमध्ये आठ महिन्यापूर्वी पपईची लागवड केली. 2100 रोपांमधून आज संपूर्ण पपईची बाग फुलली गेली. एका झाडाला अंदाजे 80 ते 100 फळ सध्या पपईची लागली असून दुष्काळी पट्ट्यातील जिराईत शेतीला आता बागायतीचे स्वरूप आले आहे. संपुर्णपणे शेणखताचा वापर करुन फुलवलेली पपईची बाग दुष्काळी भागातील शेतकऱ्यासाठी आर्थिक वरदान ठरली आहे. साधारणपणे आठ महिन्यात या पपईच्या शेतीला अडीच लाखांपर्यंतचा खर्च झाला आहे. तरी यातून सुमारे 20 ते 22 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सद्यस्थितीला 25 रुपये किलो या दराने ही पपई बाजारात व्यापाऱ्यांना विकली जात आहे.

विशेष म्हणजे माळशिरसच्या माळरानावरची पपई सध्या चेन्नई आणि कलकत्ता या ठिकाणी जाऊन पोहोचली असून सध्या राज्यात इतर ठिकाणी पपईवर रोग पडला आहे. परिणामी सरगर बंधू या शेतकऱ्यांचुया शिवारात येऊन व्यापारी पपई घेऊन जाताना दिसत आहेत. रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे पारंपारिक आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करून सरगर बंधूने पारंपारिक सेंद्रिय शेतीतून समृद्धीकडे जाण्याचा स्वीकारलेला राजमार्ग सध्या इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.