Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तृतीयपंथी समुदायाच्या कल्याणाकरीता एक दिवसीय नोंदणी शिबीराचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 20 सप्टेंबर :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. तृतीय-2018/प्र.क्र.26/सामासु मंत्रालय, मुंबई-32 दि. 13.12.2018 नुसार राज्यातील तृतीयपंथीयाच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिस-या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे. तृतीयपंथी/ट्रॉसजेन्डर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जाते. नेहमीच भेदभाव, सापत्न वागणूकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे या समाज घटकांचे शासनामार्फत मुलभुत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

गडचिरोली जिल्हयातील सर्व तृतीयपंथीय व्यक्तीना कळविण्यात येते की, दिनांक 17.09.2022 ते दिनांक 02.10.2022 या कालावधीत सेवा पंधरवडा शासनाने घोषित केला आहे. त्याचे औचित्य साधून दिनांक 29.09.2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन एल.आय.सी.रोड, गडचिरोली येथे एक दिवसीय शिबीरआयोजित केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर शिबीरात तृतीयपंथी व्यक्तींना National Portal for Transgender Persons या केंद्र शासनाच्या पोर्टलव्दारे तृतीयपंथीय असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तरी तृतीयपंथीय व्यक्तींनी व या क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्थांनी दिनांक 29 सप्टेंबर 2022 ला आयोजित केलेल्या तृतीयपंथीय व्यक्तीच्या शिबीराला सकाळी 10.30 ते 5.30 या वेळेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली या कार्यालयात उपस्थित राहावे, कार्यालयीन संपर्क क्र. 07132- 222192 वर संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे पण वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अखेर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होणार!

Comments are closed.