Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबई हायकोर्टाच्या दणक्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 23 सप्टेंबर :- मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर निर्णय देतांना काही अटी घालून शिवाजी पार्कवर दसरा घेण्यास अनुमती दिली . तसेच शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली. या निर्णया विरोधात शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार असून शिंदे गट सुप्रीम कोर्टाकडून तत्काळ निर्णयाच्या अपेक्षेत आहे.

तरी दसरा मेळाव्याबाबत सुप्रीम कोर्टात कधीपर्यंत सुनावणी होईल याबद्दल बोलताना शिंदे गटाचे वकील उत्सव त्रिवेदी म्हणाले की सोमवारपर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी पुर्ण होईल यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच या मेळाव्यावर स्टे आणून आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवाणगी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दसरा मेळाव्यासंदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आणि हा निर्णय किती दिवसांत येणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघडी सरकार कोसळलं तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आजही सुरूच आहेत. उच्च न्यायालयाने आज शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. तर उद्धव ठाकरेंना या मेळाव्यासठी परवानगी दिली आहे.

एकनाथ शिंदे गटाचे वकील उत्सव त्रिवेदी यांनी उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाचा हा निर्णय चूकीचा असून ही परवानगी अनिल देसाई यांना देण्यात आली आहे आणि अनिल देसाई हे खऱ्या शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. ते पुढे म्हणाले की, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. त्यामुळे परवानगी ही आम्हाला मिळाली पाहिजे असे त्यांनी सांगितली. सुप्रीम कोर्टात खरी शिवसेना ही शिंदे यांची असल्याचे सांगितले जाईल, असेही ते म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

अखेर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाचाच दसरा मेळावा होणार!

Comments are closed.