वेलतुर तुकुम ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत मुक्तीपथ ग्रामपंचायत समिती गठीत करण्यात आली व गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री बंद करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले.
व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा
गावात दोन विक्रेते अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करित असून अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानुसार समितीच्या पदाधीकार्यानी दोन्ही अवैध दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी केली. यावेळी एका घरी ७० देशी दारूच्या निपा मिळून आल्या. संपूर्ण माल नष्ट करून पुन्हा अवैध दारूविक्री न करण्याचे ठणकावून सांगितले. तसेच अवैध दारूविक्री करतांना आढळल्यास पोलिसांच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा
यावेळी सरपंचा संध्या नायगावकर, तंमुस अध्यक्ष अशोक कुळसंगे, समिती अध्यक्ष सचिन आत्राम, तालुका संघटक आनंद इंगळे, यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed.