Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रेकींग : चामोर्शीत भीषण अपघात; यू-टर्न घेताना ट्रकच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाजवळ चालकाने अचानक ‘यू टर्न’ घेतला आणि त्यातच घात झाला आहे..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली १८ मे : चामोर्शी-आष्टी राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी एक वाजता दरम्यान भीषण अपघात घडला. ‘यू टर्न’ घेत असलेल्या कारला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी आहे.

मृतांमध्ये गडचिरोलीचे तीन नागरिक..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या दुर्घटनेत मृत्यू झालेले तिघेही गडचिरोलीचे रहिवासी असून मृतांची नावे विनोद पुंजाराम काटवे (४५) राजेंद्र उर्फ राजू सदाशिव नैताम (४५)सुनील वैरागडे ( ५५) तर अनिल मारोती सातपुते (५०, रा. चामोर्शी) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लग्न समारंभानंतर घडली दुर्घटना..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद काटवे, राजू नैताम व सुनील वैरागडे हे तिघेही चामोर्शीत एका लग्न समारंभासाठी आले होते. समारंभ आटोपून ते आपल्या Eco Sports चारचाकी वाहन क्र.एमएच ३३ ए ०८२५ आष्टीकडे निघाले. वाटेत त्यांनी अनिल सातपुते यांना वाहनात घेतले. दुपारी साधारण १.३० वाजता, चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाजवळ चालकाने अचानक ‘यू टर्न’ घेतला आणि त्यातच घात झाला.

ट्रकने दिली भीषण धडक..

दरम्यान याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने (क्र. सीजी ०४ एलडब्ल्यू ०८२५) कारला जबर धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सातपुते गंभीर जखमी झाले.

पोलीस तपास सुरू, ट्रकचालक चौकशीत..

अपघाताची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून पोलिस ट्रकचालकासंदर्भात तपास केला जात आहे.

स्थानिकांनी मागितली महामार्ग सुरक्षेची मागणी..

घटनास्थळी हळहळ व्यक्त होत असून, ‘यू टर्न’च्या ठिकाणी स्पष्ट संकेत व वाहन नियोजन नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत असून या आधीही याच महामार्गावर अपघाताच्या घटनात वाढ होताना दिसून येत आहे.

….

Comments are closed.