४५ लाखाची मागणी, २० लाख लाच घेताना सहायक नगररचनाकार गणेश माने जाळ्यात; लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरची आतापर्यंत ची सर्वात मोठी कारवाई
कोल्हापूर, दि. ५ फेब्रुवारी: जमिनीचे मूल्यांकन कमी करण्यासाठी 45 लाखांची मागणी करून 20 लाखाची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकाऱ्याला आज कोल्हापुरात रंगेहाथ पकडण्यात आले. कसबा बावडा येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील सह जिल्हा निबंधक कार्यालयात आज दुपारी हा छापा टाकण्यात आला.
गणेश हणमंत माने (वय 45) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. माने याने तक्रारदाराकडे ४५ लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील २० लाख रूपये घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला सापळा रचून रंगेहात पकडले.
याबाबत तक्रारदाराने २२ जानेवारीला लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार खारजमा करून आज सापळा लचण्यात आला.
कार्यालयाच्या खाली चहाच्या टपरीवर ही रक्कम घेत असताना ही कारवाई केली. यावेळी एक लाख रूपयांच्या दोन हजाराच्या नोटा तर उर्वरित 1900000 पाचशे रुपयांच्या नोटा असल्याचे आढळून आले.
Comments are closed.