Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाशिकच्या अंबड भागात मुलीचे प्रेम संबंध मान्य नसल्याने बापानेच केला पोटच्या पोरीचा खून

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नाशिक 17 जानेवारी :-  अंबड लिंक रोड चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात राहणारे रामकिशोर भारती यांच्या मुलीचे एका मुलाशी प्रेम संबंध होते, मुलीचे हे प्रेम संबंध वडील रामकिशोर यांना मान्य नव्हते. या विषयावरून वारंवार मुलगी ही आपल्या प्रियकरासोबत पळून जात होती त्यामुळे संशयित रामकिशोर यांच आणि त्यांची मुलगी हिचे वारंवार भांडण होत होते. आज देखील संशयित रामकिशोर आणि त्यांची मुलगी ज्योती हिचे भांडण झाले, या भांडणात रामकिशोर यांचा राग अनावरण झाल्याने त्यांनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने ज्योती हिचा गळा आवळून तिची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी संशयित रामकिशोर भारती याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.