Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट्याने पाडला मासोळी पकडण्यासाठी गेलेल्या इसमाचा फडशा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली ४  सप्टेम्बर: मुलचेरा तालुक्यातील लगाम गावानजीक असलेल्या येल्ला या गावातील मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या  इसमावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना आज शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे . बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव मुत्ता रामा टेकूलवार वय ५५ असे आहे . टेकुलवार हे शुक्रवारी सायंकाळी मासोळ्या पकडण्यासाठी बेडुक जमा करायला शेतातील विहिरीत उतरले होते. शेताला लागूनच जंगल आहे. त्यामुळे विहिरीतून बाहेर येताच त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असावा. रात्रभर ते घरी परत न आल्याने पत्नीने सकाळी गावकऱ्यांसोबत शोधाशोध सुरू केली. शेतात टेकुलवार यांचे शीर आणि धड वेगळे झालेला मृतदेह आणि बिबट्या त्याच्याजवळ लचके तोडत असल्याचे गावकऱ्यांना दिसले. आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पसार झाला.

सदर घटना स्थळी वन विभागाची व पोलिसांची चमू पोहोचून पंचनामा केला आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.