Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सत्तेच्या गुर्मीत आमदाराने डाॅक्टरला केले अपमानित

सुभाष धोटे यांची असंवेदनशिलतापरिसरात संताप.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी, दि. ३ सप्टेंबर : गोंडपिपरी तालुक्यातील तारसा येथे डेंग्यूसदृश्य स्थिती आहे. येथे डेंगुसदृश्य तापामुळे तिघांना जिव गमवावा लागला. आमदार सुभाष धोटे यांनी तारसाखुर्द गावाला भेट दिली.

ग्रामपंचायत कार्यालयात अधिकार्यासोबत चर्चा केली. अन निघुनही गेले. पण मृतकांच्या कुटुंबियांना भेट देण्याचे सौजन्य ते दाखवू शकले नाही. उलट प्रामाणीकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला शुल्लकशा कारणासाठी अपमानीत केले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेत आमदारांकडून झालेल्या अपमानाबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सध्या जिकडेतिकडे तापाचे वातावरण आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावात डेंग्युसदृश तापाचे रूग्ण मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. मलेरिया, टायफाईट अन व्हायरल तापाने ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक केंद्र हाउसफुल आहेत.

तालुक्यातील तारसा खुर्द या गावात गेल्या पंधरा दिवसात तिन नागरिकांना आपला जिव गमवावा लागला. गावातील गंभीर स्थिती बघता आमदार सुभाष धोेटे यांनी परवा तारसा खुर्द गावात दौरा केला. ग्रामपंचायत कार्यालयात काही वेळ चर्चा करून आमदार सुभाष धोटे आल्यापावली परतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गावातील तिन लोकांचा तापाने बळी गेला. यानंतर आमदार गावात आले. पण त्या कुटुंबियाना भेट देण्याचे साधे सौजन्य आमदाराने दाखविले नाही. दरम्यान या प्रकारानंतर आता परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. संकटकाळात लोकप्रतिनीधी औदार्य दाखवित नसतील तर काय म्हणावे असा सवाल आता पुढे येउ लागला आहे.

डाॅ. प्रणील पत्रीवार हे धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. विठठलवाडा उपकेद्रात ते लसीकरणाच्या कामात होते. आमदार तारसा खुर्द येथे आल्याची माहिती कळताच पत्रीवार तारस्याला गेले. यानंतर आमदार धोटे यांनी पत्रीवार यांना आरेतुरेची भाषा वापरली. सोबत शर्टच्या बटन लाव, मी वरिष्ठ आमदार आहे, हात मागे घेऊन उभं राहायचं, वरिष्ठाकडे तक्रार करून बदली करण्याची धमकी दिल्याची माहिती पत्रीवार यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना काळात आणि आजही डेंगूसदृश परिस्थितीत आमच्या नर्स, अशावर्कर यांच्या साह्याने सर्व कामे सुरळीत असताना जनतेकडून ऐकून न घेता मला जनतेसमोर शेकडो लोकांच्या उपस्थितीत अपमानित केलं. अशी माहिती पत्रीवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अशी असंवेदनशीलता दाखवणार्या आमदारांच्या वक्तव्याचा सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

हे देखील वाचा : 

कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांची युरीयासाठी भटकंती

बीड : तालखेड येथील तरुणाचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

धुळ्यातील भूषण संजय पाटील या तरुण दिग्दर्शकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचा मानांकन

 

Comments are closed.